Tuesday, April 24, 2012

e-paper

epaper of 4 sem paactial

व्यक्तिवेध : बेबीताई कांबळे

सोमवार, २३ एप्रिल २०१२


‘रिपब्लिकन पक्षाला गटातटांमुळे भवितव्य नाही.. आता दलित पँथरसारखी चळवळ महिलांमधून उभी राहायला हवी,’ असे बरोबर वर्षभरापूर्वी, गेल्या एप्रिलमध्ये सम्यक साहित्य संमेलनात झालेल्या सत्काराला उत्तर देताना बेबीताई कांबळे म्हणाल्या होत्या. बेबीताई तेव्हाही खंगल्या होत्या, पण पँथरने जो आत्मविश्वास आणि बेधडकपणे वास्तवाला भिडण्याची वृत्ती युवकांच्या अंगी बाणवली, तसा एल्गार पुन्हा सुधारित स्वरूपात यायचा असेल तर तो महिलांमधून यावयास हवा, असे स्वप्न पाहात होत्या. बेबीताईंना ओळखले जाते ते ‘जिणं अमुचं’ या आत्मचरित्राच्या लेखिका म्हणून. प्रा. डॉ. माया पंडित यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद ‘प्रिझन्स वुइ ब्रोक’ या नावाने केला आणि पुढे फ्रेंचसारख्या अन्य भाषांतही बेबीताई कांबळे यांचे नाव पोहोचले. दलित मुलगी, युवती- स्त्री स्वतंत्र विचार कसा करू शकते, याचा हे पुस्तक म्हणजे एक उत्तम नमुना. ‘आमुचं जिणं’ सांगताना हे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे, याचे भान बेबीताईंना आहे. बाबासाहेब गावात आले म्हणून बालपणी आपणा भावंडांना केवढा आनंद झाला होता, यांसारख्या वर्णनांतून तर ते समाजाचेच चरित्र होते. डॉ. आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कसा केला, हे सांगताना त्यात आलेले अडथळे किती वास्तव होते, याचेही भान बेबीताईंना असते. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर अनेकांनी बेबीताईंनी पुढेही लिहिते राहावे, लेखिका म्हणून नाव कमवावे, अशा भाबडय़ा अपेक्षा ठेवल्या होत्या! मुळात बेबीताई कार्यकर्त्यां. मिळालेल्या मानातून त्यांनी भटक्या- विमुक्तांसाठी आश्रमशाळा फलटणजवळ काढली आणि वाढवली. सत्कार पुढेही होत राहिले, तो पैसाही बेबीताईंनी या कार्यासाठी वापरला. गेले काही महिने त्या खंगल्या व थकल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी (२१ एप्रिल) त्यांचे निधन झाल्याची वार्ता कळल्यावर, स्त्रीवादी आणि दलित साहित्याने एक आधार गमावला, याचे वाईट अनेकांना वाटले. आश्रमशाळेतील मुलींना मात्र आप्तवियोगाचे दु:ख झाले.

Monday, April 23, 2012

विद्रोही मित्रोंके लिए


hallo दोस्तों मैं हूँ चंद्रशेखर किरवले
आज जो अपने देश मैं परिस्थिति हैं वो अत्यन्त चिंताजनक हैं। आज की परिस्थितीयों में हमारे पास इसके विरोध मैं आवाज उठानेके लिए कोई भी अखबार नही हैं। लेकिन इस ब्लॉग के मध्यम से हम अपनी आवाज़, अपना असंतोष कहीं न कहीं प्रर्दशित कर सकते हैं। मुझे यह मालूम हैं की येसे ब्लॉग के मध्यम से समाज मैं कोई भी परिवरतन नहीं आनेवाला है। लेकिन इसके मध्यम से हम अपने विचारोंके लोगोंको जुटा जरुर सकते हैं और अपने संघर्ष के लिए एक नई दिशा ठहरा सकते हैं।
इन्किलाब जिंदाबाद।